Pimpri : रायजिंग स्टार टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज – रायजिंग स्टार स्पोर्टस क्लबतर्फे आयोजित टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडल्या. शाळा, महाविद्यालय स्तरावरील टेबल टेनिस स्पर्धा रविवार (दि. 17) रोजी रहाटणी येथे पार पडल्या. स्पर्धेत एकूण 60 खेळाडूंनी सहभाग घेतला.

12 वर्ष वयोगटातील अंतिम सामना विद्या व्हॅली स्कूलची मैत्रेयी गांगल विरुद्ध जी. जी. इंटरनॅशनल स्कूलची मिहीरा भालेराव यांच्यामध्ये झाला. यामध्ये 11/0, 11/7, 11/6 (3-0) असा मैत्रेयी गांगलने मिहिरा भालेराव वर विजय मिळविला.

15 वर्ष सब ज्युनिअर मुलींच्या गटातील अंतिम सामना जी. जी. इंटरनॅशनल स्कूलच्या पी. लायसा रत्ना आणि रिया मोरे यांच्यात झाला. या सामन्यात 12/10, 11/8, 11/5 (3-0) असा विजय पी. लायसा रत्ना हिने मिळवला.

15 वर्ष सब ज्युनिअर गटात पवार पब्लिक स्कूलचा सुनीत काळे आणि सिटी प्राईड निगडीचा शिखर मुंदडा यांच्यात झाला. यामध्ये सुनीत काळेने 12/10, 11/8, 11/5 (3-0) असा विजय संपादित केला.

18 वर्ष सब ज्युनिअर मुलांच्या गटात पवार पब्लिक स्कूलच्या आर्यन काळेने इंदिरा इंटरनॅशनल स्कूलच्या अरमान जसवानीवर 15/13, 11/6, 11/4 (3-0) असा विजय मिळवला.

21 वर्ष युथ बॉईज गटात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आयुष इनकाने विरुद्ध इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या गौरव आचार्य यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. हा सामना आयुषने 9/11, 12/10, 11/8, 11/7 (3-1) असा जिंकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.