Pimpri: टाटा एसने गाठले 20 लाख विक्रीचे शिखर

प्रत्येक तिस-या मिनिटाला टाटा एसने दिली नव्या व्यवसायात भरभराट करण्याची, उद्योजकतेची संधी

एमपीसी न्यूज – भारताचा अव्वल क्रमांकाचा मिनी-ट्रक असलेल्या टाटा एसने आपल्या प्रवासातील 20 लाख विक्रीचे महत्त्वपूर्ण शिखर पार केले. गेल्या १२ वर्षांपासून टाटा एसने प्रत्येक तिस-या मिनिटाला नव्या व्यवसायात भरभराट करण्याची, रोजगार निमिर्ती उपलब्ध करण्याची, त्याचबरोबर नवउद्योजकासांठी प्रेरणादायी अशा संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष:त भारतातील दुर्गम भागातील लोकांच्या जीवनात स्थित्यंतर घडवून आणण्याचे काम टाटा एसने केले आहे. दळणवळणाच्या अंतिम टप्यापर्यंत सहजपणे पोहोचण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या कामांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या टाटा एसने भारतातील छोट्या स्वरूपातील वाहतूकदारांना तसेच उद्योजकांना व्यवसायात यश मिळवून देत एक विश्वसनीय ब्रँड म्हणून आपला नावलौकिक कमावला आहे.

या अभूतपूर्व यशानंतर टाटा मोटर्सचे कमर्शियल व्हेईकल बिझिनेसचे प्रमुख गिरीश वाघ यांनी सांगितले की, “आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण असून आमच्या ग्राहकांनी भारतातील पहिल्या मिनी ट्रकला म्हणजेच टाटा एसला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 12 वर्षाच्या कालावधीत टाटा एसने 20 लाख विक्रीचे अभूतपूर्व शिखर गाठले असून हा प्रवास संस्मरणीय असाच आहे. बाजारात 65 टक्के हिस्सा प्राप्त करणा-या आघाडीच्या टाटा एसने या उद्योगातील सर्वात अष्टपैलू असे छोट्या आकाराचे व्यावसायिक वाहन म्हणून आपली ओळख सिद्ध केली आहे. अखेरच्या टप्यापर्यंत सहजपणे वाहून करण्याच्या गरजांची पूर्तता करत, भारत सरकारच्या स्वच्छ भारतासाठीच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ तसेच घरगुती वापरासाठीचे गॅस सिलिंडरची वाहतूक करत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत योगदान दिले आहे. तसेच ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करणारा टाटा एस हा भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाचा एक प्रमुख घटक बनला आहे. उल्लेखनीय असा पराक्रम केल्याबद्दल आम्ही खरोखरच खुश असून टाटा मोटर्सवर सातत्याने विश्वास ठेवणा-या आमच्या सर्व ग्राहकांचे आम्ही मनापासून आभार मानू इच्छितो”

2005 मध्ये सादर करणा-या टाटा एसने भारतातील मिनी-ट्रकची संकल्पनाच बदलून टाकली. ग्राहकांच्या अनुभवात वाढ करण्यासाठी आणि वाहतुकीद्वारे अधिकाधिक महसूल मिळवून देण्याच्या उद्देशाने डिझाइन आणि विकसित करण्यात आलेल्या टाटा एसने या विभागात अष्टपैलू म्हणून भूमिका बजावली आहे. टाटा एसने वाहनमालकांना आपला व्यवसाय वाढवण्यात मदत केली आहे. टाटा एसने विविध वातावरणात सुरक्षितता, अष्टपैलू कामगिरी याला महत्त्व दिले आहे. दुरुस्ती-देखभाल, सहजता आणि कमी खर्चिक अशा सर्व बाबतीत टाटा एस ग्राहकांसाठी सरस ठरला आहे.

सखोल ज्ञान आणि ग्राहकांच्या अंतदृष्टीने साकारलेल्या टाटा एस फॅमिलीने सातत्याने सहभागी होत, योजनाबद्धपणे गरजा ओळखत बाजारातील अंतर भरून काढण्याचे काम केले आहे. टाटा एसने इंजिनचा प्रकार, इंजिन पॉवर आणि बॉडी काँफिगरेशनमध्ये 15 पेक्षा जास्त प्रस्ताव ग्राहकांसमोर ठेवले आहेत. सद्यस्थितीला टाटा एस हा ब्रँड एससीव्ही कार्गोसाठी ब्रँड एस, झिप, मेगा आणि मिंट या प्रकारात तर ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशी वाहतुकीसाठी मॅजिक, मंत्रा आणि आयरिस या प्रकारात उपलब्ध आहे. ओलसर आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये, दीर्घ पल्ल्याच्या अवजड वाहतुकीसाठी, उत्तम क्षमता आणि चांगला टॉर्क्यू प्रदान करणारा टाटा एस हे वाहन उत्तम इंधन कार्यक्षमता, टिकाऊपणा, अरुंद गल्ल्या किंवा गर्दीच्या रस्त्यांवर आंतरशहरीय वाहतुकीसाठी किंवा प्रचंड वस्तूंची वाहतूक असो, टाटा एस हे वाहन प्रत्येक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारे आहे. टाटा एस फॅमिली ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अधिक विकसनशिल आणि कल्पक उपाययोजना प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे.

झपाट्याने वाढणा-या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्सने सर्व क्षेत्रांमध्ये वर्क शॉप्स उभारले आहेत. देशभरात वर्क शॉप्सचे जाळे उभारतानाच, टाटा मोटर्सने 1800 पेक्षा जास्त सर्व्हिस पॉइंट्स उभारले आहेत. सरासरी 62 किमी अंतरावर टाटा मोटर्सचे सर्व्हिस पॉइंट्स दिसतील. ग्राहकांच्या वाहनांची संपूर्ण सुरक्षितता घेण्यासाठी दुरुस्ती-देखभाल सेवा प्रदान करतानाच, ग्राहकांना मनाची शांती प्रदान करण्याचे काम टाटा मोटर्सतर्फे केले जात आहे. देशातील सर्वात मोठे आणि वाढते नेटवर्क स्थापन केल्यानांतर, त्यात सातत्याने सुधारणा करण्याचे, नवीन सेवा रुजू करण्याचे आणि विशिष्ट मार्केटिंग सेवा प्रदान करतानाच टाटा मोटर्सने छोट्या व्यावसायिक वाहनांच्या उद्योगात आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

"ss"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.