Pimpri: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी बैलगाडामालकांचे आंदोलन; आमदार महेश लांडगे आंदोलनात सहभागी

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि ढोंगी प्राणीमित्र जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आज (मंगळवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.  

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी (दि.13) सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये राज्यातील बैलगाडा मालक आपल्या सर्जारासाजह सहभागी झाले आहेत. लवकर उठवा शर्यतीवरची बंदी; घाटात पळूद्या पुन्हा महादेवाचा नंदी….असा नारा देत बैलगाडा मालक आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुर, अलिबाग, अहमदनगर आणि पुणे परिसरातून नागरिक आपल्या सर्जा-राजासह आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी आहेत.  तसेच विदर्भातील शेतकरी देखील आंदोलनात सहभागी झाले आहे. 

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे देखील आंदोलनात सकाळपासून सहभागी झाले आहेत. त्यांनी बैलगाडा मालकांना पाठिंबा दर्शविला आहे.

"WhatsApp

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.