Pimpri : रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याचे परिवहन मंत्र्यांचे आश्वासन

तब्बल वीस वर्षांनंतर परिवहनमंत्र्यांनी आंदोलनस्थळी जाऊन स्वीकारले निवेदन

एमपीसी न्यूज – रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करू ओला उबेर या भांडवलदार कंपन्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल. नियमावलीची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना परिवहन कायदा लागू करू. रिक्षा पासिंगसाठी अद्ययावत ट्रॅक उपलब्ध करून रिक्षाचालकांचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. 1997 नंतर प्रथमच परिवहन मंत्र्यांनी आंदोलन स्थळावर जाऊन निवेदन स्वीकारले आहे.

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील लाखो रिक्षाचालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी कृती समिती अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात गुरुवार (दि. 14 डिसेंबर) रोजी महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चाला समोर येऊन सहभागी होत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

परिवहन मंत्री यांनी स्वतः येऊन रिक्षा चालकांचे निवेदन स्वीकारावे अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका रिक्षा चालकांनी घेतल्यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते स्वतः निवेदन घेण्यासाठी आंदोलन स्थळी आले आणि निवेदन स्वकरले. आमदार गौतम चाबुकस्वार, प्रतापराव पाटील चिखलीकर, कपिल पाटील, जयदेव गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

या आंदोलनात महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचे नेते नरेंद्र गायकवाड (नांदेड), गफार नदाफ (कराड), प्रमोद घोणे (मुंबई), मधुकर थोरात बाळा जगदाळे (पनवेल), कासम मुलाणी, मारुती कोंडे, विजय पाटील (नवी मुंबई), महेश चौघुले, मन्सूर नदाफ (मिरज), मल्हार गायकवाड, शिवाजी गोरे, गणेश जाधव (कल्याण डोंबवली), शंकर पंडित (कोल्हापूर), तानाजी मसळकर, महिपत पवार, राजू सिधगणे (सोलापूर), प्रल्हाद सोनवणे (जळगाव), इलियाज लोदी खान (अकोला), आनंद चैरे, रवी तेलरंधे, जावेद शेख (नागपूर), मच्छिंद्र कांबळे (लातूर), राजू पडगीलवर (अमरावती), देवबाबू निखडे (वर्धा), मोशश्वर लोकरे (चंद्रपूर), आचार्य सर, फारुख बागवाला, नितीन शिंदे, आनंद तांबे, प्रदीप भालेराव, आनंद अंकुश, दत्त पाटील (पुणे), बाबूभाई शेख, आनंद सदावर्ते (लोणावळा) आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.