Pune : राज्य शासनामार्फत लघु उद्योजकांना देण्यात येणाऱ्या जिल्हा पुरस्काराच्या अर्जासाठी मुदतवाढ

एमपीसी न्यूज – जिल्हयातील पात्र लघु उद्योजकांना राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2017 अशी होती त्यास मुदत वाढविल्याने दिनांक 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत, अशी माहिती पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी. डेकाटे यांनी दिली आहे.

जिल्हयातील उद्योग क्षेत्रातील असामान्य करणाऱ्या लघु उद्योजकांकरिता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास रु.15 हजार व व्दितीय पुरस्कार रु.10 हजार व मानचिन्ह देण्यात येते. जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग-2 स्थायी लघु उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा, दिनांक 1 जानेवारी 2014 पुर्वीचे भाग-2 तसेच उद्योग घटकम मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा.

पुरस्कारासाठी लघु उद्योगांची निवड ही त्यांनी केलेली भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता तसेच प्रथम पिढीतील नव उद्योजक, उत्पादित वस्तू बाबतची गुणवत्ता, निर्यातक्षम सनदी लेखापाल यांचे प्रमाणपत्र इ. बाबींचा विचार करण्यात येतो.

विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्जाकरिता व पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे दूरध्वनी क्रमांक 020- 25539587,25537966 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.