Pimpri : सतत होणाऱ्या भांडणातून शेजारी राहणाऱ्या महिलेने केले तरुणावर कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज – घराशेजारी राहणाऱ्या महिलेने सतत होणाऱ्या भांडणाच्या रागातून महिलेने तरुणावर कुऱ्हाडीने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री साडे सातच्या सुमारास पिंपरी मधील विठ्ठलनगर येथे घडली.

सविता जाधव असे वार केलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रविण भागवत (वय 30, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि प्रवीण विठ्ठलनगर येथे शेजारी-शेजारी राहतात. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून वारंवार भांडण होत होते. दोन दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर सोमवारी दोघे पुन्हा एकमेकांसमोर आले. त्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा वाढला आणि सविता हिने प्रवीणला ठार मारण्याचा उद्देशाने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये प्रवीण गंभीर जखमी झाला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी तात्काळ पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.