Pimpri : अमृता तेंडुलकर यांची एनआयपीएमच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) राष्ट्रीय खजिनदार पदावर अमृता तेंडुलकर (Pimpri) यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.

अमृता तेंडुलकर या गेल्या पंधरा वर्षांपासून मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित असून सध्या त्या एनआयपीएम च्या पुणे विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच स्किल डेव्हलपमेंट व मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘यशस्वी ग्रुप’ मध्ये त्या मनुष्यबळ व्यवस्थापक या पदावर सध्या कार्यरत आहेत.

Pune : गणेशोत्सवामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले अटक; 7 लाख 30 हजार रुपयांचे मोबाइल जप्त

एनआयपीएम ही (Pimpri) भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून विविध औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रश्न सामूहिक प्रयत्नातुन सोडवणे, त्यांच्यासाठी विविध परिसंवाद आयोजित करणे, विविध व्यवस्थापन कार्यशैलीच्या माहितीचे आदान- प्रदान करणे, व्यवस्थापन क्षेत्राविषयीची संशोधन पत्रिका प्रकाशित करणे अशा विविध स्तरावर एनआयपीएमचे कार्य चालते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.