Pune : गणेशोत्सवामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले अटक; 7 लाख 30 हजार रुपयांचे मोबाइल जप्त

एमपीसी न्यूज : पुणे शहरात (Pune) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकांची अवाक जावक मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये लोकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना हडपसर आणि कोंढवा अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडू 7 लाख 30 हजार रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे 51 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

हडपसर येथे पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यातून येऊन गणेशोत्सवाच्या गर्दीमध्ये चोरी करणा-या टोळीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार हडपसर पोलिसांनी सापळा रचून कौशल मुन्ना रावत (वय 21, रा. बंगाल बाजार लखनौ, उत्तरप्रदेश), मंतोषसिंग श्रवण सिंह (वय 22, रा. बाबूरपूर, जिल्हा सायरगंज, झारखंड), सुरज रामलाल महातो उर्फ नोनिया (वय 30, रा. बाबूरपूर, जिल्हा सायरगंज, झारखंड), जोगेश्वर कुमार महतो (वय 30, रा. बाबूरपूर, जिल्हा सायरगंज, झारखंड) आणि पश्चिम बंगाल येथील एक अल्पवयीन अशा पाच जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्याकडून 3 लाख 80 हजार रुपये किमतीचे 20 मोबाईल जप्त करण्यात आले (Pune) आहेत. गणेशोत्सवा दरम्यान गर्दी अधिक असते. त्या गर्दीमध्ये चोरी करण्यासाठी लखनऊ येथे एकत्र भेटून रेल्वेने पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर, स्वारगेट, बंडगार्डन, फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याचे तपासात उघड झाले. पोलीस नाईक अंकुश बनसोडे हे पुढील तपस करत आहेत.

दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी व्यक्ती मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सतिश देवाहिरेकेरुर( वय 36, रा. टाटा सोसायटी, घोरपडी) यास पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Eco Friendly Ganeshotsav : अष्टविनायक मित्र मंडळ करते आगळे वेगळ्या पद्धतीने इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे विसर्जन

मुंढवा पोलिसांद्वारे सतिश हिरेकेरुर यास अटक केली असून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 31 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सतिश हिरेकेरुर याने मुंढवा, भारती विद्यापीठ, सहकारनगर, मार्केट यार्ड परिसरात गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या आयएमइआयवरुन मोबाईल मालकाचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

हि कामगिरी करण्यासाठी अंमलदार दिनेश भांदुर्गे व महेश पाठक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याबाबतचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तसेच नागरीकांना गणेशोत्सवा दरम्यान स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.