Pimpri : तब्बल 22 फुटी रांगोळीमधून साकारले बाबासाहेब!

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पिंपरीमध्ये 280 किलो रांगोळीचा वापर करून तब्बल 22 फुटी रांगोळीमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे 6 युवा कलाकारांनी न थांबता सलग तीन दिवस अथक मेहनत घेऊन या रांगोळीत प्राण फुंकले आहेत. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना अंशुल क्रिएशन्सच्या ग्रुपने सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मानवंदना दिली आहे. पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारक य़ेथे  रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीने आतापर्यंतच्या सर्वात भव्य रांगोळीचा मान मिळवला आहे.
  • रांगोळीच्या एका बाजूला महाडचा चवदार तळे सत्याग्रह, संविधान भारताला अर्पण करताना बाबासाहेब, कायदे मंत्रीपदाची शपथ घेतानाचे प्रसंग रेखाटण्यात आले आहेत तर बाबासाहेबांचे तीन गुरु भगवान बुध्द, संत कबीर, महात्मा फुले यांची प्रतिकृती रांगोळ्यातून साकारण्यात आली आहे. यांचे भव्य चित्र रेखाटण्यात आले आहे. तब्बल 280 किलो रांगोळीचा त्यासाठी वापर  व बाकीच्या रांगोळ्या 9 बाय 4 फुट एवढ्या आकारात काढण्यात आल्या आहेत. अशी माहिती अंकुश क्रिएशन्सच्या तृप्ती जगताप यांनी दिली.
तृप्ती जगताप यांच्यासह  6 कलाकारांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यात नंदू शिंदे, जितेंद्र वैष्णव, विनोद वैष्णव, मयूर गायकवाड, चेतन क्षीरसागर. आम्रपाली साबळे या कलाकारांनी ही रांगोळी काढण्यास सुरुवात केली. सोमवारी (दि. 8) दुपारी दोन वाजता रांगोळी काढण्यास सुरुवात केली ती रांगोळीजी पूर्ण होण्यास गुरुवारी (दि. 11) मध्यरात्रीचे दोन वाजले.  ही रांगोळी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.