Amrit Mohotsav: आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त देशभरात होणार 75 दिवस 75 कार्यक्रमांचे आयोजन

एमसीपी न्यूज : उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आझादी का अमृतमहोत्सव’च्या(Amrit Mohotsav) औचित्याने निघालेल्या ‘आयसीएआय एमएसएमई सेतू’ आणि ‘आयसीएआय एमएसएमई यात्रा’ला उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया(आयसीएआय) तर्फे ही यात्रा मुंबईहून निघाली असून 75 दिवस 75 शहरात फिरून 75 कार्यक्रमांतुन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि त्यासंबंधीच्या नियम, योजना याबाबत जागृती केली जात आहे,” अशी माहिती ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे व्हाईस चेअरमन सीए राजेश अगरवाल व पिंपरी शाखेचे व्हाईस चेअरमन सीए सचिन बन्सल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

या आयसीएआय एमएसएमई यात्रेचे शुक्रवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्वागत करण्यात आले. प्रसंगी  ‘आयसीएआय’च्या पुणे व पिंपरी शाखेचे पदाधिकारी सीए प्रितेश मुनोत, सीए अमृता कुलकर्णी, सीए हृषीकेश बडवे, सीए सचिन मिनियार, सीए मौसमी शहा, एमएसएमई कमिटीचे सचिव डॉ. संबीत मिश्रा, उद्योग विभागाचे सहसंचालक अभय दफ्तरदार, लघु उद्योग भारतीचे रवींद्र सोनवणे, ‘एमसीसीआय’चे व्हाईस चेअरमन दीपक करंदीकर, सिडबीचे उपमहाव्यवस्थापक मनीष कुमार, सीए महेश्वर मराठे, सीए संतोष दोषी, सीए श्रीकांत दंडवते, सीए रवींद्र कामात यांच्यासह उद्योगांशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

MPC News Podcast 20 August 2022: ऐका आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देणाऱ्या विविध प्रयत्नांचे प्रदर्शन असलेला हा रथ शहरात फिरवण्यात आला. दिवसभर उद्यम नोंदणी, कर्ज योजना, अनुदान योजना याची माहिती व अन्य विषयांवर मार्गदर्शन सत्र अयोजिले होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम आयोजित केले होते.(Amrit Mohotsav) उद्योगनगरीतील उद्योजक, विविध संस्था, प्रादेशिक विभाग, स्थानिक चेंबर्स, इंडस्ट्री असोसिएशन, एमएसएमई केंद्रे यांच्या प्रतिनिधी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

सीए राजेश अगरवाल म्हणाले, “उद्योगातील विविध घटक आणि एमएसएमई यांच्यातील दुवा म्हणून सनदी लेखापाल (सीए) महत्वाची भूमिका बजावतो. सीए हा त्यांच्या गरजांना तात्काळ प्रतिसाद देतो. (Amrit Mohotsav) भारत सरकारच्या ‘एमएसएमई’ मंत्रालयातील प्रतिनिधी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सिडबी) प्रतिनिधी, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे (एनएसआयसी) प्रतिनिधी, बँक अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी व सनदी लेखापाल आदींनी दिवसभर झालेल्या सत्रात मार्गदर्शन केले.”

 

एमएसएमई आणि सिडबीच्या योजना पोचवण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. तसेच उद्यम आधारामुळे होणारे फायदे लोकांना अद्यापही माहीत नाही. त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. उद्यम आधार असेल तर तुमच्या व्यवसायाचे रिकव्हरी लवकर करता येऊ शकते.(Amrit Mohotsav) त्याचा प्रचार प्रसार करणे हा देखील या यात्रेचा उद्देश आहे, असे बन्सल यांनी सांगितले. अमृता कुलकर्णी, मनीष कुमार यांनी यात्रा, सीएची भूमिका आणि सिडबी योजना याबाबत माहिती दिली. सीए अमृता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.