Accident cases: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात महिन्यांत 474 अपघात, 176 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये  या वर्षीच्या सात महिन्यांमध्ये जानेवारी ते जुलै 2022 मध्ये एकूण 474 अपघात होऊन त्यामध्ये 176 जणांचा मृत्यू झाला आहे.(Accident cases) तर सर्वाधिक 107 जणांचा मृत्यू हा टू व्हीलर अपघातात झाला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये या वर्षीच्या सात महिन्यांमध्ये जानेवारी ते जुलै 2022 मध्ये एकूण 474 अपघात झाले आहेत. यातील 163 घातक स्वरूपाचे अपघात होते ज्यामध्ये 176 जणांचा मृत्यू झालेला आहे. सर्वाधिक 235 अपघात हे टू व्हीलर संबंधी झाले आहेत. ज्यामध्ये 99 जीवघेण्या अपघाताची नोंद करण्यात आली असून या अपघातात 107 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

टू व्हीलर संबंधी या कालावधीमध्ये एकूण 235 अपघात झालेले आहेत. यामध्ये 99 अपघातात 107 जणांचा मृत्यू झालेला आहे.(Accident cases) 111 अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते तर 159 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. तसेच 21 किरकोळ अपघातात 23 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

Mansoon League: स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग क्रिकेट स्पर्धेत 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट क्लब संघांची विजयाची हॅट्रीक !

पदचार्‍यांसबधी एकूण 129 अपघात या कालावधीमध्ये झालेले आहेत.(Accident cases) यामध्ये 43 फेटल अपघातात 43 जणांचा मृत्यू झालेला आहे. 70 गंभीर अपघातात 83 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. तसेच 16 किरकोळ अपघातात 17 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

सायकल संबंधी या कालावधीमध्ये एकूण 12 अपघात झालेले आहेत. यामध्ये 1 फेटल अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे. 9 गंभीर अपघातात 9 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले.(Accident cases) तसेच 2 किरकोळ अपघातात 2 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

ऑटो रिक्षा संबंधी या कालावधीमध्ये एकूण 15 अपघात झालेले आहेत. यामध्ये 5 फेटल अपघातात 6 जणांचा मृत्यू झालेला आहे.(Accident cases) 5 गंभीर अपघातात 9 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. तसेच 5 किरकोळ अपघातात 8 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

Maharashtra Kala : अशोकजी परांजपे पुरस्कार डॉ. सुचेता भिडे-चापेकर आणि डॉ. रामचंद्र देखणे यांना जाहीर

कार, टॅक्सी आणि लाईट मोटर वेहिकल (एल एम व्ही) संबंधी या कालावधीमध्ये एकूण 53 अपघात झालेले आहेत. यामध्ये 8 फेटल अपघातात 12 जणांचा मृत्यू झालेला आहे.(Accident cases) 11 गंभीर अपघातात 16 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. तसेच 12 किरकोळ अपघातात 16 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

ट्रक्स किंवा लॉरीज संबंधी या कालावधीमध्ये एकूण 24 अपघात झालेले आहेत. यामध्ये 7 फेटल अपघातात 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. 7 गंभीर अपघातात 13 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. तसेच 2 किरकोळ अपघातात 2 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

बसेस संबंधी या कालावधीमध्ये एकूण 6 अपघात झालेले आहेत. 2 गंभीर अपघातात 5 जणांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. तसेच 1 किरकोळ अपघातात 1 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.