Pimpri Fire News : पिंपरीमध्ये एका बिल्डिंगला आग; परिसरातील हौसिंग सोसायटीचा विद्युत पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील (Pimpri Fire News) अजमेरा कॉलनी येथील एका बिल्डिंगमधील मीटर बॉक्सेसच्या केबिनला आग लागली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील हौसिंग सोसायटीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.