Chikhali : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

एमपीसी न्यूज  – भाजी आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 16 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी घरकुल चिखली (Chikhali) येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेश रमेश इंगळे (वय 20, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Accident cases: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात महिन्यांत 474 अपघात, 176 जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शनिवारी दुपारी बारा वाजता भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. घरकुल येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर आल्यानंतर आरोपीने मुलीचा पाठलाग केला. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीवर प्रेम असल्याचे सांगत (Chikhali) तिचा हात पकडून गैरवर्तन करत विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.