Pimpri Chinchwad : पहिल्याच बैठकीत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

एमपीसी न्यूज : जमिनीच्या प्रकरणांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांचा (Pimpri Chinchwad) हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत नवनियुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. चौबे यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी सोमवारी (19 डिसेंबर) शहरातील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त (एसीपी) आणि उपायुक्त (डीसीपी) यांची बैठक घेतली.

दोन वर्षांपूर्वी टेल्को रोडवरील एका जमिनीच्या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अवाजवी रस घेतला. त्यामुळे खरेदी आदेशावर पोलिस बंदोबस्तात आरोपींच्या सह्या घेतल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी कोट्यवधींची फसवणूक झाल्यानंतर संबंधित वृद्धाने राज्य सरकारचे दरवाजे ठोठावले. तत्कालीन राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते.

चौकशी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी तत्कालीन पोलिस आयुक्तांची बदली झाली. मात्र, चौकशी समितीचा अहवाल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधित सरकारला सादर केला. या जमिनीच्या प्रकरणांमध्ये पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, दोन वरिष्ठ निरीक्षक, चार कर्मचारी, तीन माजी नगरसेवक आणि काही खासगी व्यक्तींवर तपास समितीने गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडमधील गेल्या दोन वर्षांतील जमीन प्रकरणांचा आढावा राज्यस्तरावर घेण्यात आला आहे. राज्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त चौबे यांची काल पहिली बैठक (Pimpri Chinchwad) झाली. या पहिल्याच बैठकीत नवनियुक्त आयुक्तांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले.

Pune : सोसायटी सदस्यांच्या संमतीशिवाय मजल्याचे बांधकाम सुरू केल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

“आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरिकांची गर्दी असते, याचा अर्थ एकतर पोलिस स्टेशन स्तरावर नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही किंवा पोलिस ठाण्यात न जाता थेट आयुक्तांना भेटायचे आहे. या दोन्ही कारणांचा विचार केला पाहिजे,” असे चौबे म्हणाले. गरज असलेल्या नागरिकाचे म्हणणे ऐकून कायद्यानुसार ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा. कार्यपद्धती भिन्न असू शकतात, परंतु आमच्या कार्यपद्धतीचा नागरिकांवर विपरीत परिणाम होऊ नये. परिणामी, नागरिक कायद्याची मदत घेण्यासाठी पुढे येतील,” असे चौबे पुढे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.