Pune : सोसायटी सदस्यांच्या संमतीशिवाय मजल्याचे बांधकाम सुरू केल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : नाना पेठेतील (Pune) सिटी सर्व्हे क्रमांक 563 सी आणि 563 डी येथे चौथ्या मजल्याचे बांधकाम सुरू केल्यानंतर सोसायटी ताब्यात न दिल्याबद्दल शहा संघवी असोसिएट्स आणि फर्मच्या भागीदारांविरुद्ध पुणे शहर पोलिसांतर्गत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2011 ते 2022 या कालावधीत नाना पेठेतील मेफेअर आर्केड सोसायटीत घडली होती.

धर्मेश विठ्ठलदास शहा (वय 45) आणि इक्बाल शेख (वय 65, रा. एमजी रोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अजय अमरलाल दर्डा (वय 45, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी कलम 406, 420, 34 मोफा कायदा कलम 3, 4, 5, 8 आणि 13 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

PMC : कराच्या पैशातून परदेशी पाहुणे खुश ठेवण्याचा प्रयत्न; आपचा पुणे महापालिकेवर आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेश शाह आणि इक्बाल शेख हे संघवी शाह असोसिएट्स आणि फर्मचे भागीदार आहेत. सिटी सर्व्हे क्रमांक 563 सी मध्ये 251.53 चौरस फूट आणि 563 डी मध्ये 636.63 चौरस फूट क्षेत्रात तीन मजले बांधण्याची अट त्यांनी करारनाम्यात ठेवली होती. त्यांनी सोसायटीच्या सदस्यांची संमती न घेता चौथ्या मजल्यावर बांधकाम सुरू केल्याची माहिती आहे.

सोसायटीची जागा व इमारत संस्थेच्या नावावर (Pune) हस्तांतरित करणे बंधनकारक असतानाही आजतागायत हे हस्तांतरण झालेले नाही. याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने समर्थ पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.