PMC : कराच्या पैशातून परदेशी पाहुणे खुश ठेवण्याचा प्रयत्न; आपचा पुणे महापालिकेवर आरोप

एमपीसी न्यूज – जी 20 परिषदेच्या निमित्ताने (PMC) पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैशाचा गैरवापर परकीय व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी केला जात आहे. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्याऐवजी केवळ मेकअप करून प्रश्न सुटणार नाहीत. पुणेकरांचा पैसा वापरताना पर्यावरण आणि पुण्याचा शाश्वत विकासाचा विचार करण्याची विनंती आम आदमी पक्षाच्या बचत गट विभागच्या शहर महिला संघटक सिमा गुट्टे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना केली.

यावेळी वैशाली डोंगरे, गणेश तारळेकर उपस्थित होते. जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील 60 चौक आणि चौकात बेटे यांचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे एकसारखे असावेत. ते नादुरूस्त किंवा बंद असू नयेत, यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पथदिव्यांच्या खांबांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.

Pune : बिडी कामगारांच्या किमान वेतन संदर्भात लेबर ऑफीसकडून कारवाई करण

सुशोभिकरणाचाच एक भाग म्हणून (PMC) विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर विजेचा झगमगाट असलेली कृत्रिम झाडे उभारली जाणार आहेत. ही झाडे आठ दिवसांसाठी भाडेत्त्वावर घेतली जाणार आहेत. एका झाडावर 180 वॅटचा बल्ब असून, एका झाडासाठी 15 ते 20 हजार रुपये भाडे जाणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्याचा निषेध आपतर्फे करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.