Maval : टाकवे येथील शिबिरात 751 विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी

एमपीसी न्यूज : टाकवे बुद्रुक (Maval) येथील शिवशाही मित्र मंडळ व व्हिजन स्प्रिंग फाऊडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरीता मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात 751 मुलांमुलींची डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यातील 61 जणांना चष्मा लागला असून शिबिरात त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. व्हिजन स्प्रिंग संस्था मागील अनेक दिवसांपासून मावळ तालुक्यात आरोग्य सेवा देत आहे.

याप्रसंगी टाकवे गावचे माजी सरपंच भूषण असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, टाकवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मारुती असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, शिक्षण समिती अध्यक्ष अनिल असवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मोढवे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नवनाथ आंबेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मोढवे, जीप संघटना अध्यक्ष उल्हास असवले, टाकवे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर व व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad : पहिल्याच बैठकीत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

शिबीर सोमवार व मंगळवार सकाळी 10 ते 4 या वेळेत दोन दिवस (Maval) जिल्हा परिषद शाळा टाकवे व न्यु इग्लिश स्कुल टाकवे या ठिकाणी आयोजित करण्यात होते. व्हिजन स्प्रिंग संस्था मावळ तालुक्यात आरोग्य सेवा मागील अनेक दिवसांपासून देत असुन अनेक ठिकाणी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांना मोफत चष्मे वाटप करत आहेत. तसेच, मुलांना शालेय साहित्य कंपास वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असून नेहमीच सार्वजनिक उपक्रम राबविण्यात टाकवे गावात अव्वल असलेल्या शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.