Pimpri : …… असे आहे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होत आहे. आयुक्तालयाची अति वरिष्ठ, वरिष्ठ अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालयाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाकडून 15 आॅगस्ट दरम्यान नोटिफिकेशन काढण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आयुक्तालयाचे काम सुरु होणार आहे.

दरम्यान आयुक्तालयासाठी अधिका-यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. पालिकेकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेय इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरु आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट पोलीस आयुक्तालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरु होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 22 लाख आहे. यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मंजूर करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत.

नव्या आयुक्तालयाबाबत काही महत्वाच्या बाबी –

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अति वरिष्ठ अधिकारी –
पोलीस आयुक्त (आर के पद्मनाभन)
अतिरिक्त पोलीस आयुक्त (मकरंद रानडे)
पोलीस उप आयुक्त (नम्रता पाटील, विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील)

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी –
सहाय्यक पोलीस आयुक्त – 7
पोलीस निरीक्षक – 67
सहाय्यक पोलीस निरीक्षक – 86
पोलीस उप निरीक्षक – 215
सहाय्यक पोलीस उप निरिक्षक – 373

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी –
पोलीस हवालदार – 745
पोलीस नाईक – 1022
पोलीस शिपाई – 2163
अकार्यकारी दल (पोलीस कर्मचारी व वर्ग – 4) – 125
पोलीस दवाखान्यासाठी कर्मचारी – 31

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन – (15)
पुणे आयुक्तालयातून येणारे स्टेशन (9)
पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी

पुणे ग्रामिणमधील समाविष्ट होणारे स्टेशन (5)
चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहुरोड

नव्याने सुरु होणारे पोलीस ठाणे (1)
चिखली

पोलीस अधिका-यांची नियुक्ती आणि कमतरता
पोलीस आयुक्त –
मंजूर पद – 1
नियुक्ती – 1

अतिरिक्त पोलीस आयुक्त –
मंजूर पद – 1
नियुक्ती – 1

पोलीस उप आयुक्त –
मंजूर पद – 3
नियुक्ती – 3

सहाय्यक पोलीस आयुक्त –
मंजूर पदे – 7
नियुक्ती – 2
कमतरता – 5

पोलीस निरीक्षक –
मंजूर पदे – 67
नियुक्ती – 14
कमतरता – 53

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.