PCMC News : हाऊसिंग सोसायटीधारकांच्या ‘प्रिमिअर लिग 2023’ला उदंड प्रतिसाद, 2 दिवसांत 50 संघाची नोंदणी

एमपीसी न्यूज – सोसायटीधारकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होण्याच्या हेतूने राहुल कलाटे फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीधारकांसाठी घेण्यात येणा-या पिंपरी-चिंचवड प्रिमिअर लिग 2023 ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. (PCMC News) अवघ्या दोन दिवसात 50 संघाची नोंदणी झाली असून 5 जानेवारीपर्यंत संघाची नोंदणी केली जाणार आहे. 7 जानेवारीला वाकड येथील सिल्हव्हर स्पोट््र्स  क्रिकेट मैदानावर स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. 51 हजार रुपयांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. शहरात मोठ-मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होण्याच्या हेतून राहुल कलाटे फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड प्रिमिअर लिग 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे कोणत्या स्पर्धा होत नव्हत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे यंदा स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेसाठी सोसायटीधारकांच्या संघाची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणीसाठी http://https.//forms.gle/urHbqrJ7vygey7989 ही लिंक देण्यात आली आहे. मागील दोन दिवसात 50 संघाची नोंदणी झाली आहे. 5 जानेवारीपर्यंत संघाची नोंदणी सुरु राहणार आहे. (PCMC News) त्यामुळे शहरातील सोसायटीधारकांच्या संघाची आणखी मोठ्या संख्येने नोंदणी होईल. यादृष्टीने आयोजकांकडून तयारी सुरु आहे. डे-नाईट क्रिकेट स्पर्धा केवळ विकेंडला घेतल्या जाणार आहेत. 7 जानेवारी रोजी वाकड येथील सिल्हव्हर स्पोट््र्स  क्रिकेट मैदानावर या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दर शनिवारी, रविवारी सामने होतील. नोंदणी झालेल्या संपूर्ण संघाचे सामने होत नाहीत, तोपर्यंत दर शनिवारी, रविवारी क्रिकेट मॅचचे सामने होणार आहेत.

Bhosari News : ‘इंद्रायणी थडी’च्या नोंदणीसाठी प्रतिसाद,  3 दिवसांत 1500 हून अधिक ऑनलाईन अर्ज

याबाबत माहिती देताना माजी नगरसवेक, आयोजक राहुल कलाटे म्हणाले, ”फाऊंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी वुमन वंडर स्पर्धा घेण्यात येतात. त्याचधर्तीवर पुरुषांसाठीही क्रिकेट स्पर्धा घेण्याची मागणी सोसायटीधारकांकडून आली होती. त्यानुसार यंदा पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीधारकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होण्याच्या हेतूने  प्रिमिअर लिग 2023चे आयोजन करण्यात आले आहे. त्याला सोसायटीधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसात 50 संघाची नोंदणी झाली असून 7 जानेवारीला स्पर्धेला सुरुवात होईल”.

या स्पर्धेचे नियोजन सोसायटीधारकच करत आहेत. त्यासाठी उदय साभ्दे, सुधीर देशमुख, राजेश कांबळे, व्यंकटेश बजाज, समिर बनकर, विजय चौव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील सोसायटीधारकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9922501690 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.