Bhosari News : ‘इंद्रायणी थडी’च्या नोंदणीसाठी प्रतिसाद,  3 दिवसांत 1500 हून अधिक ऑनलाईन अर्ज

एमपीसी न्यूज – संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या इंद्रायणी थडी जत्रेला यावर्षी तुफान प्रतिसाद मिळत आहे. संयोजकांनी सुरू केलेल्या ऑनलाईन (Bhosari News) नोंदणीला अवघ्या तीन दिवसांत 1500 हून अधिक इच्छुकांनी स्टॉल बुकिंगकेले आहे.

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने प्रतिवर्षी महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता या हेतूने भोसरीमध्ये इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन केले जाते. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी महिला बचत गट आपली उत्पादने विक्रीसाठी स्टॉल लावतात.

Vadgaon Maval : तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 2.70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

यावर्षी एकूण 800 स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला बचत गटांची विविध खाद्य उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, जीवनावश्यक वस्तू असे विविध स्टॉल नागरिकांसाठी पर्वणी राहणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जत्रेचे नियोजन असून, मनोरंजन, ऑटोमोबाईल, पर्यावरणपुरक उत्पादने, रोजगार मेळावा, विविध स्पर्धा, ग्राम संस्कृती, लहान मुलांसाठी खेळणी अशा सुमारे 150 निरनिराळे उपक्रम नागरिकांना मोफत पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळतील. यासाठीही ऑनलाईन नोंदणी करता येते. त्यासाठी https://qrco.de/bdar38 या लिंकवर अर्ज करता येईल. तसेच, अधिक माहितीसाठी  संजय पटनी 9851318513 आणि  राहुल पाखरे 8856808833 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समन्वयक संजय पटनी यांनी केले आहे.

ऑनलाईन बुकिंग अर्जांची होणार छाननी

इंद्रायणी थडी  जत्रेकरिता ऑनलाईन स्टॉल बुकिंग सुविधा आहे. त्यामुळे इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.  संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 10 हजार अर्ज नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यामाध्यमातून केवळ 800 स्टॉल निश्चित करण्यात येतील. त्यासंदर्भात अर्जांची छाननी करण्यात येईल. (Bhosari News) प्रामुख्याने खाद्य पदार्थांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार आहेत. उत्पादनांसाठी विविध स्टॉल प्रकारण उपलब्ध करुन दिले आहेत. सर्व नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असून, ‘लकी ड्रॉ’ द्वारे स्टॉल वाटप केले जाणार आहे.  ऑनलाईन बुकिंग सुविधा 5 जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असेही आवाहन पटनी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.