Bhosari News : स्वंयपाक येत नाही म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत मारहाण

एमपीसी न्यूज स्वंयपाक व घरातील कामे येत नाहीत (Bhosari News) म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार 25 जुन 2018 ते आजपर्यंत घडला आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेच्या फिर्यादीवरून विशाल नारायण गाडे (वय 30 रा. परभणी) व सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : ‘इंद्रायणी थडी’च्या नोंदणीसाठी प्रतिसाद,  3 दिवसांत 1500 हून अधिक ऑनलाईन अर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला स्वंयपाक तसेच भांडी धुण्याच्या कारणावरून चिडून जाऊन, तुला स्वयंपाक येत नाही तु माझे घर सोडून जा म्हणत आरोपींनी शिवीगाळ (Bhosari News) व मारहाण केली तसेच पीडितेला उपाशी ठेवून शारीरिक व मानसीक त्रास दिला आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.