Pimpri-Chinchwad : वेरॉक वेंगसरकर संघाची बाजी; विरेन मिरजे सामनावीर

एमपीसी न्यूज : थेरगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात वेरॉक वेंगसरकर मैदानावर सुरु असलेल्या 14 वर्षाखालील वेरॉक चषकातील (Pimpri-Chinchwad) साखळी सामन्यात वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकदमीच्या संघाने पुना क्लब संघावर 7 गडी राखून सहज विजय मिळवला आहे. या सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करणारा विरेन मिरजे सामनावीराचा मानकरी ठरला आहे.

प्रथम फलंदाजी करताना पुना क्लबचा संघ 41 षटकांमध्ये 103 धावांवर आटोपला. यामध्ये क्षितीज एडे 24 धावा, आलाप पंगु 17 धावा आणि अर्जुन देशमुख नाबाद 19 धावा यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. तथापि, वेरॉकच्या संघाने 17 धावा अतिरिक्त दिल्यामुळे पुना क्लबच्या संघाला 103 धावांपर्यंत पोहचता आले.

यावेळी वेरॉक संघाचा गोलंदाज विरेन मिरजे याने 8 षटकांत 18 धावा देत 2 गडी बाद केले. यामध्ये त्याने 3 षटके निर्धाव टाकली. त्याला अभिषेक तोपनो 2 गडी, आरुष पासलकर 2 गडी यांनी चांगली साथ दिली. विहान आणि सुबोध यांनी प्रत्यकी 1 बळी मिळवला.

Talegaon Dabahde : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

उत्तरादाखल वेरॉकच्या संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 105 धावांचे आव्हान 29.4 षटकांत सहज पार केले. प्रज्वल मोरे नाबाद 33 धावा, ओम पाटील 20 धावा, अर्जुन गायकवाड 19 धावा, आणि तरुण श्रीकृष्णन नाबाद 15 धावा यांनी केलेल्या खेळीच्या (Pimpri-Chinchwad) जोरावर वेरॉकच्या संघाने पुना क्लबवर सहज विजय मिळवला. पुना क्लबच्या वतीने आलाप पंगु यांने 2 गडी बाद केले.

या सामन्यात भाऊसाहेब डांगे, विकास चौधरी यांनी पंच म्हणून भूमिका बजावली. धावफलक संचालनाची जबादारी अजय मोरे यांनी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.