Talegaon Dabahde : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरच्या ध़डकेत डोक्याला (Talegaon Dabahde) मार लागून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण –तळेगाव दाभाडे रोडवर सुदवडीगाव येथे शनिवारी (दि.4) साय़ंकाळी घडला.

याप्रकरणी विक्रम केशव राऊत (वय 33, रा.रावेत) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंटेनर (एनएल 01 एई 6222) चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला.  या अपघातात शशांक संजय पोवार (वय 33, रा.किवळे) यांचा मृत्यू झाला आहे.

Pimpri : नारायणा स्कॉलिस्टीक शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी उपयुक्त – शंकरसिंह राठोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक हे दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपी हा त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव (Talegaon Dabahde) वेगाने चालवत होता.यावेळी त्याने बेदरकारपणे गाडी चालवून शशांक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात शशांक खाडी पडले व त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते मृत्यूमुखी पडले. कंटेनर चालक तेथे थांबून मदत न करता तेथून पळून गेला. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.