Wakad : ट्रेकिंगला गेल्याने विद्यार्थ्यांना त्रास; 13 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – वाकड येथून लोणावळा येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांची (Wakad ) प्रकृती बिघडली. त्यामुळे 13 विद्यार्थ्यांना वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना हा त्रास झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भूमकर चौक, वाकड येथील एका शाळेतील सुमारे 300 विद्यार्थी लोणावळा येथील राजमाची येथे शनिवारी (दि. 5) ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंगवरून आल्यानंतर काही विद्यार्थ्यांना थकवा जाणवू लागला. रविवारी काही जणांना अस्वस्थ वाटणे तसेच चक्कर येणे असा त्रास सुरु झाला. सोमवारी काही विद्यार्थ्यांना वाकड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pimpri-Chinchwad : वेरॉक वेंगसरकर संघाची बाजी; विरेन मिरजे सामनावीर

खासगी रुग्णालयातील डॉक्टरने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले, “सोमवारी सकाळी 13 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल (Wakad ) करण्यात आले. चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु केले. शरीरातील पाण्याची पटली कमी झाल्याने हा त्रास झाला आहे. रुग्णालयात साधे बेड शिल्लक नसल्याने काहींना अतिदक्षता विभागातील बेडवर ठेवण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.”

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ म्हणाले, “विद्यार्थी ट्रेकिंगला गेले होते. तिथे डोंगर चढाई केल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याबाबत चौकशी केली जाईल. सध्या पालक अथवा शाळेची कोणतीही तक्रार नाही.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.