Earthquake : दिल्लीसह उत्तर भारत पुन्हा भूकंपाने हादरला; केंद्रबिंदू पुन्हा नेपाळ

एमपीसी न्यूज : शुक्रवारी रात्री बसलेल्या (Earthquake) भूकंपाच्या तीव्र धक्क्याने दिल्लीसह इतर राज्य देखील हादरले. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी पुन्हा एकदा दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. मोठमोठ्या इमारती देखील एखाद्या  झुल्याप्रमाणे हादरून गेल्या आहेत. अवघ्या तीन दिवसात हा दुसरा मोठा भूकंप असून त्याची  तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. तसेच त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्येही होता.

Wakad : ट्रेकिंगला गेल्याने विद्यार्थ्यांना त्रास; 13 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

गेल्या दीड ते दोन महिन्यांत तिसऱ्यांदा भूकंपाचे हे जोरदार धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, बंगाल (Earthquake) आणि देशातील इतर भागात हा भूकंप जाणवला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजली गेली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.