Pimpri Crime News : पिंपरी गावात 80 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – पिंपरी गावात घरफोडी करून (Pimpri Crime News) अज्ञातांनी 80 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी वैष्णव देवी मंदिराजवळ उघडकीस आली.

 

परमानंद किशनचंद इसराणीन (वय 63, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 11) रात्री (Pimpri Crime News) अकरा ते रविवारी (दि. 12) सकाळी पाच वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून 50 हजारांचे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30  हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.