Chinchwad Bye-Election : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी – आदित्य ठाकरे

एमीपीसी न्यूज – राज्यातील घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. (Chinchwad Bye-Election) कारण, त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केल्याचा हल्लाबोल युवा सेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल काटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे महाविकास आघाडीचा मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, गद्दारांना जाब विचारणार्‍याच्या मागे पोलीस लावले जातात. लाठीचार्ज केला जातो. त्याच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात. राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच पटलेली नाही. लोकांमध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले.

Pimpri Crime News : पिंपरी गावात 80 हजारांची घरफोडी

मात्र, त्यांनी आपल्या आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच ते दुसर्‍या पक्षात गेले आणि निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, आठ महिन्यांपूर्वी राज्यात निर्लज्जपणाचे गलीच्छ राजकारण राज्यात घडले. असे राजकारण आपण आयुष्यात पाहिले नाही. (Chinchwad Bye-Election) ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. त्यामुळे आजही महाविकास आघाडीच्या सभेला लोकांची गर्दी दिसून येते. कारण लोकांचा विशेषत: महिलांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे. लोकांच्या एकजुट आपल्याबरोबर आहे. या ताकदीच्या जोरावर महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.