Nigdi News : “गण गण गणांत बोते” च्या जयघोषात निगडीत गजानन महाराज प्रगट दिन साजरा

एमपीसी न्यूज – गण गण गणांत बोते च्या जयघोषात, हजारो भक्तांच्या उपस्थितीत  आज (सोमवारी) निगडी प्राधिकरण येथे (Nigdi News) श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.  यावेळी माजी नगरसेवक राजु मिसाळ,अमित गावडे, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर,धनंजय काळभोर, संगीता भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी   सकाळी सात वाजता  श्रींच्या पादुका व मूर्तीवर उद्योजक अभय असलकर, योगेश निमोदिया यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला.दिनकर पुणतांबेकर  निलेश शिंदे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. तसेच प्रकटदिनाच्या पूर्व संध्येला  गजानन विजय ग्रंथाचे (Nigdi News) सामुदायिक  पारायण,  भजन, प्राधिकरणातून पालखी मिरवणूक काढण्यात आली . यावेळी भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या टाकत, महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. हजारो भाविकांनी औक्षण करून दर्शन घेतले.

Chinchwad Bye-Election : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी – आदित्य ठाकरे

प्रकटदिनाच्या दिवशी मात्र  पहाटे पाच ते साडे सहा वाजता काकड आरती, तसेच सकाळी सात ते साडे नऊ यावेळेत सीमा यशवंत दिघे, प्रेमा गणेश हेगडे,कल्याणी रसिक पिसे यांच्या हस्ते महापुजा महाभिषेक व आरती करण्यात आली.   गोपाळ कोकाटे आणि सहकारी भावसुमने हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

यशवंत पाटील व पुरुषोत्तम गोळे यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली, त्यानंतर  महाप्रसाद दुपारी डॉ अनघा राजवाडे व सहकारी शेगांवच्या महंता हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. अविनाश लेले शुभांगी मुळे,मोहन पारसनिस रवी शिधये,नरेंद्र काळे भक्तीरंग हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. संध्याकाळी हभप चंद्रकांत (Nigdi News) महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. रमेश ढमढेरे व अतुल इनामदार यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

 

याबरोबरच  गजानन महाराज ट्रस्ट, सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट,प्रांत पोलीसिंग मित्र संघ आणि निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने  भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, एम एस तारक,एम इ जाधव, उपाध्यक्ष भाऊराव खडसे,सचिव देवीदास  हरमकर,खजिनदार महादेव कथले, अभय तारक रसिक पिसे, विकास ठाकरे, रवी मिरजी, सचिन राडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.