Pune News : विभक्त झालेले कुटुंब लोकन्यायालयामुळे 15 वर्षानंतर पुन्हा एकत्र

एमपीसी न्यूज : लग्न झाले, त्यांना दोन मुले, एक मुलगी झाली. मात्र या मुलांच्या जन्मानंतर त्यांच्यात गैरसमज वाढले.त्यातून ती मुलांसह वेगळी राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचाराची केस केली. न्यायालयाने पोटगीही मंजुर केली. (Pune News) त्यांची घटस्फोटाची केस सुरू होती. 2009 मधील या केससाठी ते दर तारखेला कोर्टात येत.न्यायालयाने पुढाकार घेऊन त्यांचे समुपदेशन केले. मुलांनी आम्हाला दोघेही हवेत, असे सांगितले. त्यानंतर ते तब्बल 15 वर्षानंतर एकत्र आले.लोकन्यायालयात शनिवारी ही केस निकाली काढण्यात आली.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्ग यांच्या प्रयत्यांनी एक कुटुंब पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात अशी 6 जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार करण्याचा निश्चय केला.तो हडपसरला राहत असून एका खासगी कंपनीत कामाला होता. तीन मुलांनंतर त्यांच्यातील वाद विकोपाला जाउन ते वेगळे राहू लागले.मुले तिच्याकडे राहू लागली. तिने पोटगीसाठी अर्ज केला. न्यायालयाने तिला पोटगी मंजुर केली. कौटुंबिक हिंसाचाराची केसही दाखल होती. ते नियमित केससाठी न्यायालयात येत होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्ग यांच्या हे लक्षात आले. त्यांनी दोघांना समुपदेशनासाठी बोलावले.मुले तयार झाली.

Nigdi News : “गण गण गणांत बोते” च्या जयघोषात निगडीत गजानन महाराज प्रगट दिन साजरा

मुलांनी आम्हाला दोघे हवे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याचा परिणाम झाला. दोघांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली.त्या नंतर सर्व बाबी पुर्ण करून ते दोघे एकत्र आले. इतर पाच प्रकरणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके यांच्या न्यायालयात निकाली निघाली. (Pune News) लोकन्यायालयात पाच जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्यावर संमती दर्शवली. दोन्ही घरातील इतरांच्या त्यांच्या संसारात होत असलेल्या हस्तक्षेपामुळे ते गेली 5 वर्ष वेगळे राहात होते. तिचा पतीही एकत्र राहायला तयार होता. तुम्ही एकमेकांना वेळ द्या. ऍड. प्रियाल घोष यांनी मुस्लिम कुंटुंबातील महिलेला वास्तवाची जाणीव करून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर ते एकत्र आले.

प्रेमविवाहानंतर आर्थिक वादातून विभक्त

त्यांचा प्रेमविवाह झालेला. दोन मुले झाली. त्या नंतर त्यांच्यात आर्थिक कारणांवरून वाद होऊ लागले.जवळपास दोन वर्ष ते वेगळे राहात होते. (Pune News) या वेगळे राहण्याचा त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला. औषधोपचार सुरु झाले. वेगळे झाल्याने होत असलेली फरफट लक्षात आल्याने दोघानी संमजसपणा दाखविला. ऍ़ड. ययाती कोठेकर यांनी त्यांच्यात समेट घडवून आणला आणि ते पुन्हा एकत्र आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.