Pune Crime News : नवविवाहित तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज-हुंड्यासाठी छळ केल्याने नवविवाहित ( Pune Crime News ) तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-Pune News : लोकन्यायालयामुळे विभक्त झालेले कुटुंब 15 वर्षाेनंतर पुन्हा एकत्र

हर्षदा बधे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे. तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती आनंद बधे, सासू व सासरे (तिघे रा. मातोश्री निवास, संकेत विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वर्षा शिवरकर (वय 22, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि हर्षदा यांचा गेल्यावर्षी मे महिन्यात विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरू करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात (  Pune Crime News ) आली. छळामुळे हर्षदाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक टी. एन. खळदे तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.