Pimpri News : लोकशाहीचे भवितव्य महात्मा गांधी व आंबेडकर यांच्या विचारांवर अवलंबून -हरी नरके

एमपीसी न्यूज – बिघडलेल्या मशीन वर घाव कुठे घालायचा, हे जसं शोधावं लागतं तसं लोकशाही बळकट करायची असेल तर समाजात नेमका घाव कुठे ( Pimpri News ) घालावा लागेल, हे गांधी आणि आंबेडकरांना समजलं होतं , असे मत प्रा. हरी नरके यांनी  एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा कला मंचच्या वतीने आयोजीत व्याख्यानमालेत ते बोलत होते.

समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा कला मंचच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार समाजाला प्रेरित करतील या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या परिवर्तन व्याख्यानमालेचे हे सतरावे वर्ष. या व्याख्यानमालेतील 109 वे पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते समकालीन सामाजिक व राजकीय घडामोडींचे अभ्यासक प्रा हरी नरके यांना बोलावण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही. महामुनी, संस्थेच्या एच. आर. हेड मा.गार्गी दत्ता , संस्था समन्वयक  प्रशांत तनपुरे , संस्थेचे चेअरमन  राजेंद्र पवार , विश्वस्त सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

Chinchwad Bye-Election : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी – आदित्य ठाकरे

यावेळी बोलताना  आप्पासाहेब पवार व आपण यांच्यामध्ये पुस्तक हा एक मैत्रीचा धागा होता , त्यांच्याविषयी आठवण काढून प्रा नरके सरांनी व्याख्यानाला सुरुवात केली.  महात्मा गांधी स्वतःला शेतकरी म्हणायचे तर आंबेडकरांनी घरातल्या एका मुलाने शेती करावी व बाकीच्यांनी शिक्षण व उद्योग व्यवसायात ( Pimpri News ) पडावे , असा अमूल्य विचार पुढे आणला. दोघांनी शेतीला केंद्रस्थानी मानले होते.

गांधी आणि आंबेडकर यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते पण एकमेकांशी वैचारिक ताकद ओळखून त्यांनी लोकशाहीला महत्त्व दिले. त्या काळात अनेक विद्वान होते परंतु गांधीजींना घटना लिहून घेण्यासाठी आंबेडकरांवर विश्वास होता. घटना लिहिताना अनेक अडचणी आल्या, त्यातील आम्ही भारतीय या शब्दावर बराच खल करण्यात आला. शेवटी गांधी आंबेडकर यांनी लोकशाही पद्धतीने मान्यता घेऊन आम्ही भारतीय या शब्दावर शिक्कामोर्तब केला.

स्त्रियांना आणि सुधारणा कमी दर्जा दिल्याने, अशा प्रकारची अन्यायकारक बाब खपवून घेणार नाही म्हणून मनुस्मृतिचे दहन करून समाजात लोकशाही प्रतिनिधिक स्वरूपात आणली. धर्मनिरपेक्षता 2014 नंतर धोक्यात आली. गांधी आणि आंबेडकर या दोघांचा संगतवार विचार करूनच देशाची लोकशाही मजबूत होऊ शकेल या आणि अशा प्रकारचे अनेक मुद्दे त्यांनी आपल्या व्याख्यानात मांडले.

या व्याख्यानात त्यांनी विविध प्रसंगांचे मार्मिक दाखले, उदाहरणे व संदर्भासहित स्पष्टीकरण केले. व्याख्यानानंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. व्याख्यानाचे सूत्रसंचालन,परीचय व ( Pimpri News ) आभार स्वामीराज भिसे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.