Pune : प्रा. हरी नरके हे परखड व्यासंगी विद्यापीठ – गझलकार मसूद पटेल 

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ विचारवंत चळवळीचे शिलेदार प्रा हरी नरके यांचे निधन (Pune) ही विविध परिवर्तनवादी चळवळीला आणि ज्ञान क्षेत्राला हानी पोहचवणारी अत्यंत दुःखद घटना आहे. प्रा. हरी नरके हे परखड व्यासंगी विद्यापीठ होते, असे मत ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांनी व्यक्त केले.

ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित ‘विचारांच्या पाणवठयावर’ या विषयावर निमंत्रित कवी कवयित्रींचे कविसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक कांबळे, प्रमुख पाहुणे प्रा सूर्यकांत नामगुडे, कुमार आहेर, सुधाकर फुले, कांतीलाल गवारे, छगन वाकचौरे, जगदीप वनशिव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीताराम नरके आदी उपस्थित होते.

प्रा हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरुवातीला भारताच्या संविधानाचे पूजन करण्यात आले. कवयित्री जयश्री सोनवणे यांनी श्रद्धांजली पर गीत सादर केले.

 Alandi : अधिक मासानिमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी ‘मी महात्मा फुले बोलतोय’ एकपात्री प्रयोग सादर केला. किशोर टिळेकर, आनंद गायकवाड, चंद्रकांत जोगदंड, जनाबापू पुणेकर, दत्तात्रय केंजळे, रामचंद्र गुरव, पांडुरंग म्हस्के, जयश्री सोनवणे, अमिनिरूस्सा शहा, दीपिका कटरे, आशा शिंदे, गिरीश जाधव, धर्मा शिंदे, शामराव कांबळे, देविदास झुंरूगे, राहुल भोसले आदींनी कविता सादर केल्या.

अध्यक्षीय भाषणात मसूद पटेल म्हणाले, हरी नरके यांनी एक साहित्यिक अभ्यासक व साक्षेपी संपादक म्हणून त्यांनी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली. हरी नरके यांच्या लेखणीचा हा लहेजा जगावेगळा होता. त्यांनी बुध्दीमत्ता आणि व्यासंग जपला.

पंडित्याचे प्रदर्शन न करता बौध्दिक क्षमता विकसित करण्यासाठी सत्य जगासमोर मांडताना वंचित शोषित समाजाच्या हितासाठी पूरक ठरेल असे विचार मांडले. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात प्रा हरी नरके यांचा खारीचा वाटा होता. या महान कार्याची महती सर्वांनाच ज्ञात आहे, असेही मसूद पटेल म्हणाले.

प्रमुख पाहुणे व्याख्याते सुधाकर फुले, कांतीलाल गवारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच हरी नरके यांच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. उपस्थित सर्व साहित्यिकांना सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. सीताराम नरके यांनी प्रास्ताविक केले. सत्कार विजया नरके यांनी तर सीताराम नरके यांनी आभार (Pune) मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.