Alandi : अधिक मासानिमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – दि.13 रविवार रोजी आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनाकरिता  सकाळपासूनच माऊली (Pune) मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

Talegaon Dabhade : ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक चळवळ व्हावी – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

मंदिर परिसराच्या आजू बाजूने तसेच इंद्रायणी घाटावरती सुध्दा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. अधिक मासानिमित्त बांधण्यात आलेल्या मंडपामध्ये अनेक भाविक पुरुषोत्तम देवतेचे पूजन करून दान करत होते.

हार,फुल ,प्रसाद व वारकरी साहित्य वस्तू भांडारात अनेक नागरिक खरेदी करताना दिसत होते. इंद्रायणी घाटा वरील असलेले वाहन पार्किंग वाहनाने पूर्णपणे भरलेले होते.

दि.12 रोजी कालसुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली होती. काल एक लाखाहून अधिक भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन (Pune)  घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.