Pune Crime : टुरीस्ट व्हिसावर येऊन पुण्यात नोकरी करणाऱ्या पाच परदेशी महिलांवर हद्दपारीची कारवाई

एमपीसी न्यूज – टुरीस्ट व्हिसावर येऊन पुण्यात मसाज पार्लर (Pune Crime) मध्ये काम करणाऱ्या पाच महिलांवर परकिय नागरिक नोंदणी विशेष शाखा पथकाने हद्दपारीची कारवाई केली आहे.

व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करत या महिला कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत एनआयबीएम रोडवर मसाज पार्लर येथे काम करत होत्या. त्या 2022 मध्ये भारतात टुरीस्ट व्हिसावर आल्या होत्या. याची खबर परकीय नागरिक नोंदणी विभागाला माहिती मिळताच त्यांनी महिलांना ताब्यात घेत त्यांची 4 फेब्रुवारी रोजी तपासणी करण्यात आली होती.

Pune Crime News : नवविवाहित तरुणीची आत्महत्या

नोकरी कऱण्याचा व्हिसा नसतानाही त्या भारतात येऊन बेकायदेशीररित्या काम करत होत्या. या पाच ही महिलांना ताब्यात घेऊन पथकाने 11 फेब्रुवारी रोजी विमान तिकीटांची (Pune Crime) सोय करून त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या-त्यांच्या मायदेशी विमानाने परत पाठवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.