Pimpri News : प्राधिकरणात रंगला कथक नृत्याचा आविष्कार

एमपीसी न्यूज – भारतरत्न लता मंगेशकर यांचा प्रथम स्मृतिदिन,दास नवमी आणि मराठी भाषा दिन यांचे अवचित्य साधून  शर्मिला बाबर यांनी शनिवारी (दि.11)  मनोहर वाढोकर सभागृह,प्राधिकरण येथे इये मराठीचीये नागरी’ या कार्यक्रमा चे आयोजन ( Pimpri News) केले होते. शब्दरंग कला साहित्य कट्टा यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नुपूर नृत्यालय  च्या संचालिका डॉ सुमेधा गाडेकर यांनी त्यांच्या 45 शिष्यां सह अतिशय बहारदार कार्यक्रम सादर केला.गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.  दास नवमी चे विशेष औचित्य साधून मनाचे श्लोक सादर केले. मोगरा  फुलला आणि रंगा येई या लता दीदी नी गायलेल्या गाण्यावर उत्तम नृत्य ( Pimpri News) सादर झाले. मराठी भाषे चे वैविध्य दाखवणारी पाऊस गीते सादर झाली. यामध्ये 5 वर्षांपासून 50 वर्षे वयाच्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात ए आई मला पावसात जाऊ दे,घन घन माला नभी दाटल्या,ऋतू हिरवा अशा अवीट गोडीच्या गाण्यावर नृत्य प्रस्तुती करण्यात आली.

Chinchwad Bye-Election : भाजप स्वार्थी; गंभीर आजारी असतानाही मुक्ताताई, लक्ष्मणला मतदानाला नेले – अजित पवार

कुसुमाग्रजांच्या ओळखलंत का सर मला….या कवितेवर ही नृत्य प्रस्तुती करण्यात आली. पावनखिंड या चित्रपटातील शिवरायांच्या गाण्यावर सादर झालेल्या नृत्य प्रस्तुतीला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला।घेई छंद मकरंद या कट्यार काळजात घुसली या लोकप्रिय चित्रपटातील गाण्यावर सादर करण्यात आलेल्या नृत्याला ( Pimpri News) प्रेक्षकांनी खूप पसंत केले. अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेल्या माऊली माऊली या गण्या वर केलेल्या नृत्या ने कार्यक्रमा ची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ज्योती कानेटकर यांनी केले होते।मधूश्री कला आविष्कार च्या माधुरी ओक,शब्दरंग कला साहित्य कट्टा चे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी आदी मान्यवर कार्यक्रमा ला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.