Chinchwad Bye-Election : भाजप स्वार्थी; गंभीर आजारी असतानाही मुक्ताताई, लक्ष्मणला मतदानाला नेले – अजित पवार

एमपीसी न्यूज – मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप दोघेही गंभीर आजारी असताना भाजपने राज्यसभा आणि विधानपरिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्याकरिता रुग्णवाहिका करुन त्यांना मुंबईला मतदानासाठी नेले. एवढे काय घडले होते. एक दोन मते कमी झाली असती. (Chinchwad Bye-Election) तर, काही आकाश पडले नसते. दगदग दोघांना सहन होत नव्हती. पण, पक्षाकरिता गप्प बसले. एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा या दोन आमदारांनी दाखविला. निवडणुकीपेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचे आरोग्य महत्वाचे आहे हे सांगायला पाहिजे होते. परंतु, स्वार्थी लोकांनी ते सांगितले नाही.भाजप स्वार्थी असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर सोडले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा आज (सोमवारी) वाल्हेकरवाडीत संयुक्त मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  माजी मंत्री, शिवसेना नेते  (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट)  डॉ. राजेंद्र गवई, आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम  उपस्थित होते.

Nigdi News : निगडी प्राधिकरण येथे एक दिवसीय रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अजित पवार म्हणाले,  भाजपने एवढ्या स्वार्थीपणा केला. वास्तविक मुक्ताताई आणि लक्ष्मण दोघेही एवढे गंभीर आजारी होते. पण, त्यांचे राज्यसभा आणि विधानपरिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्याकरिता रुग्णवाहिका करुन यांना मुंबईला मतदानासाठी नेले. एवढे काय घडले होते. एक दोन मते कमी झाली असती तर काही आकाश पडले नसते. दगदग दोघांना सहन होत नव्हती. पण, पक्षाकरिता गप्प बसले. (Chinchwad Bye-Election) एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा या दोन आमदारांनी दाखविला. पण, कुठेही निवडणुकीपेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचे आरोग्य महत्वाचे आहे हे सांगायला पाहिजे होते. परंतु, स्वार्थी लोकांना ते सांगितले नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात भाजप नव्हतीच. दोन ते तीन चार शिवाय भाजपचे नगरसेवक निवडून आले नव्हते. फोडाफोडीच्या राजकारणातून पक्ष वाढवितात. पक्षांतरबंदी कायद्यालाही तिलांजली दिली.

भावनिक मुद्दा करण्याचे काही कारण नाही. ज्या व्यक्तीचे दुख:द निधन झाले. त्या व्यक्तीला राजकारणात मी सगळी ताकद दिली. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, पक्षाचा अध्यक्ष केला. विधानपरिषद, विधानसभेवर अपक्ष निवडून आले. प्रत्येकाला व्यक्ती, मत स्वातंत्र्य आहे. आम्हाला सोडून गेले तरी कधी आकस ठेवला नाही. उलट रुग्णालयात दाखल असताना मला ज्यावेळेस वेगळे सांगण्यात आले. मी ताबडतोब माझ्या ज्या काही ओळखी आहेत. काही लोकांना फोन करुन आवश्यक असलेली इंजेक्शन आणली. उपलब्ध केली. त्यातून काही काळ आपला सहकारी आपल्यामध्ये काम करायला लागला, असेही पवार म्हणाले.

अतिशय उत्तमपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करणारे सरकार पाडले. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजप-शिंदे गटाला त्यांची ताकद कळाली आहे. ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाउतार व्हावे लागले. त्याचा बदला पोटनिवडणुकीत घ्यायचा आहे असे सांगत पवार म्हणाले. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शहरात कोयता गँग आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही. महिला आमदारांवर हल्ला होत आहे. पत्रकाराचा खून केला. याचा जनतेने विचार केला पाहिजे.

महापालिका निवडणुकीबाबत काही काळजी करु नका, व्यवस्थित, राजकीय ताकदीप्रमाणे जागा वाटप केले जाईल. पण, आताच्या काळात आपल्या मतांची विभागणी होणे परवडणारे नाही. एक-एक मत महत्वाचे आहे. गाफील राहू नका, गैरसमज करु नका, काहीजण म्हणतात आम्हीच त्याचा अर्ज ठेवायला सांगितले. पण, त्यात अजिबाबत तथ्य नाही. शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले.(Chinchwad Bye-Election) आता त्यालाही कळू द्या किती ताकद आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने वेळोवेळी सिद्ध केले आहे. यावेळीही तसे दाखवायचे असल्याचे पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.