Nigdi News : निगडी प्राधिकरण येथे एक दिवसीय रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज –  सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या ( Nigdi News ) बाराव्या स्मृतिदिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथे रविवारी  (दि.12) रक्तदान, मोफत आरोग्य तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्वर्गीय ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देवकुळे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी संजीवनी रक्तपेढी – भोसरी, लोकमान्य हॉस्पिटल – निगडी आणि भोर क्लिनिक यांनी सहकार्य केले. संजीवनी रक्तपेढीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ब्याऐंशी रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता.

Pune Crime news : तीन दुकाने फोडून चोरली पावणे दोन लाखांची रोकड

लोकमान्य हॉस्पिटल च्या सहकार्याने रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, हाडांची घनता याविषयीच्या चाचण्यांचा सत्तर नागरिकांनी लाभ घेतला; तर डॉ. विशाल भोर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने पंचेचाळीस रुग्णांची मौखिक आणि दंतचिकित्सा केली. तसेच याप्रसंगी समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचे ( Nigdi News ) कार्य करणाऱ्या भास्कर गोखले आणि रस्त्यावरील अनाथ, गरीब मुलांना शैक्षणिक साहाय्य करणाऱ्या अमित उर्फ आम्रपाली मोहिते (तृतीयपंथी) यांना फाउंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.