Pimpri Crime News : फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन घेऊन तो जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना 3 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता संत तुकाराम नगर येथे घडली असून याप्रकरणी 18 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित मोहन माने (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संत तुकाराम नगर येथील एका हॉटेल जवळ थांबलेले असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा नऊ हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल फोन फोन करण्यासाठी घेतला. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.