Pimpri Crime News : मोबाईल फोन चोरीचे आणखी तीन प्रकार उघड

एमपीसी न्यूज – शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरट्यांमुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. रविवारी (दि. 22) आणखी तीन मोबाईल फोन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सागर भागवत बोरले (वय 33, रा. देहू फाटा, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे कंपनीच्या पिकअप पॉइंटवर बसची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला. ही घटना देहू फाटा, आळंदी येथे 14 मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

अक्षय मोहन धावणे (वय 27, रा. मोहन नगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी  फिर्यादी रस्त्यावर थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील पाच हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला. जबरी चोरीचा हा प्रकारअनुकूल चौक, एमआयडीसी भोसरी येथे 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

विनोद चंद्रकांत बिरादार (वय 32, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोशी टोल नाक्याजवळ बुधवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास जबरी चोरीचा हा प्रकार घडला. फिर्यादी व त्यांचा मित्र हे मोशी टोल नाक्याजवळ असताना रिक्षातून तीन अनोळखी चोरटे आले. फिर्यादी व त्यांच्या मित्राला चोरट्यांनी धमकी देऊन त्यांच्याकडील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर फिर्यादीला 250 रुपये तर फिर्यादीच्या मित्राला तीन हजार 500 रुपये एका मोबाईल नंबरवर जबरदस्तीने पाठविण्यास सांगितले. असा एकूण 18 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पळून गेले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.