Kamshet News : 99 वर्षांच्या आजीने 86 वर्षांच्या भावाला बांधली राखी, वृद्धाश्रमात पार पडलं अनोखं रक्षाबंधन 

एमपीसी न्यूज – बहीण भावांचे नातं आणखी घट्ट करणारा रक्षाबंधन सण रविवारी सर्व ठिकाणी उत्साहात पार पडला. कामशेतमधील किनारा वृद्धाश्रमात अनोखं रक्षाबंधन पार पडले. याठिकाणी 99 वर्षांच्या आजीने 86 वर्षांच्या भावाला बांधली राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. 

बहीण भावाच्या नात्याला वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. किनारा वृद्धाश्रमात देखील सर्वांनी एकत्र येत वृद्धांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. यावेळी 99 वर्षांच्या आजींच्या चेह-यावरील आनंद व उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांना स्वतःच्या बहीण भावांपासून दूर असल्याची उणीव भासली नाही. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच आजोबांनी आजींना भेटवस्तू दिली.

अनेक महिने अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांना देखील कार्यक्रमासाठी बाहेर आणण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमातील लोकांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.