Pimpri Bribery Case News: स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना तात्पुरता जामीन, चौघांना न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – लाच प्रकरणात अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना आज (सोमवारी) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केले. तर, इतर चार कर्मचा-यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना एसीबीने बुधवारी (दि. 18) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे,  त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे  (संगणक ऑपरेटर) आणि  अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.19) पहाटे अटक केली. त्यांना दोनवेळा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. लांडगे यांनी घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.