Pimpri News: महापालिका पदाधिकारी, अधिका-यांच्या दालनात बसविणार टीव्ही; सीसीटीव्हीचा निधी वळविला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिका-यांच्या दालनात टीव्ही बसविण्यात येणार आहे. तातडीच्या बातम्या पाहण्यासाठी डीश टीव्ही यंत्रणा पुरविण्यात येणार आहे.

त्यासाठी ‘अधिकारी, पदाधिकारी यांस टीव्ही न्यूज चॅनल सुविधा पुरविणे व बील अदा करणे’ असे नवीन उपलेखाशिर्षक नव्याने निर्माण केले जाणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा पुरविणे व चालन करणे या लेखाशिर्षावरील दोन लाख रुपयांचा निधी वळविण्यात आला आहे.

महापालिकेच्या विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनामध्ये तातडीच्या बातम्या पाहण्यासाठी डीश टीव्ही बसविण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, पक्षनेता, विरोधी पक्षनेता आणि सर्व प्रभाग अध्यक्ष यांच्या दालनात टीव्ही बसविण्यात येणार आहे. तर, जे अधिकारी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पे-बॅड एस-25 किंवा त्यापेक्षा जादा वेतश्रेणीत आहेत असे सर्व अधिकारी यांच्या दालनात टीव्ही बसविण्यात येणार आहे. मासिक वापर मर्यादा व बील अदायगीचे दर निश्चित केले आहेत. उभारणीचा खर्च 2 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष, मासिक बील अदायगी 500 रुपये राहणार आहे.

या कामासाठी अणू विद्युत व दुरसंचार विभागाचे सन 2021-22 महसूली अंदाजपत्रकात अधिकारी, पदाधिकारी यांस टीव्ही न्यूज चॅनल सुविधा पुरविणे व बील अदा करणे’ असे नवीन उपलेखाशिर्षक नव्याने निर्माण केले जाणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा पुरविणे व चालन करणे या लेखाशिर्षावरील दोन लाख रुपयांचा निधी वळविण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.