Chakan Crime News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी दहा वाजता सोनवणे वस्ती, कुरुळी येथे उघडकीस आली.

पुष्पराज दामू गाडगे (वय 32, रा. सोनवणे वस्ती, कुरुळी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडगे यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची महागडी दुचाकी शनिवारी (दि. 21) रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर जिन्याखाली पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.