Pimpri Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी भोसरी, चाकण परिसरात दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी भोसरी आणि चाकण परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. या दोन ठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

चाकण परिसरात चाकण पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजीव कुमार नथुलाल चर्मकार (वय 22, रा. म्हाळुंगे, मुळगाव – मध्य प्रदेश) आणि भोसरी याठिकाणी भोसरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत शहाजी गोपीनाथ पवार (वय 30, रा. रांजणगाव, शिरूर) या आरोपींना अटक करण्यात आली.

चाकण परिसरात अटक आरोपी राजीव कुमार चर्मकार याने 153 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता. तसेच भोसरी परिसरात शहाजी पवार या आरोपीने 2 किलो 388 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.