Pimpri : ह्युमन सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे डॉ. नरेंद्र काशीद यांना राज्यस्तरीय पुरस्कार

एमपीसी न्यूज – ह्युमन सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात वडगाव मावळ येथे शासकीय भात संशोधन केंद्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल डॉ. नरेंद्र काशीद यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी युवक क्रांती दलाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक कुमार सप्तर्षी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

मानव अधिकार दिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीला जन्मतः हे मूलभूत अधिकार प्राप्त होतात. त्याचे रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने मानव अधिकार दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मानव अधिकार क्षेत्रात काम करणा-यांचा या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

वडगाव मावळ येथे शासकीय भात संशोधन केंद्रात शासनाची 40 एकर भात शेती आहे. या संशोधन केंद्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल डॉ. नरेंद्र काशीद यांचा गौरव करण्यात आला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.