Pimpri : डॉ. अनिल पाटील यांना मानद डॉक्टरेट प्रदान

एमपीसी न्यूज – संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक्स अँड हॉस्पिटलचे संचालक डॉ.अनिल पाटील यांना नुकतीच इकोल सुपिरियर रॉबर्ट डी सॉबर्न युनिवर्सिटी कडून बँकॉक येथे “मानद डॉक्टरेट” ही पदवी बहाल करण्यात आली.

डॉ. पाटील यांचा अनेक वर्षांपासून सातत्याने असलेला आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार आणि योगदान तसेच योग, रेकी, ॲक्युपंक्चर,फिजिओथेरपी, ऍलोपथी यांच्या संगमातून तयार केलेल्या अनोख्या संयुक्त उपचार पद्धतीचे जनक असलेल्या डॉ. पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.