Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला अखेर यश

सहाजणांची उपाध्यक्षपदी निवड; अखेर नाराजी संपली

एमपीसी न्यूज – शहर भाजपामध्ये जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असणारी नाराजी अखेर आज संपली. ओल्ड इज गोल्डच्या माध्यमांतून एकत्र आलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना उपाध्यक्षपदी निवड केली.

भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी नंदु उर्फ नितीन विश्वनाथ भोगले, गणेश वसंतराव चव्हाण, संतोष विठ्ठल घुले, द्वारकादास सुरेंद्रनाथ कुलकर्णी, रवींद्र नारायणराव नांदुरकर, दत्तात्रय कारभारी कोरडे यांची भाजप शहर उपाध्यक्षपदी निवड करुन संघटनेत काम करण्याची संधी मिळवून दिली.

  • पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना ‘ओल्ड इज गोल्ड’ भाजप या नावाने एकत्र आणुन माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी शहराच्या राजकारणात धमाल उडवुन दिली. तेव्हापासुन शहरातील अडगळीत पडलेले सर्व जुने कार्यकर्ते प्रवाहाच्या मुख्य पटलावर आले. एवढेच नव्हे तर दोन सरचिटणीस सहा उपाध्यक्ष पदे देऊन शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना त्यांची दखल सुध्दा घ्यावी लागली.

याबाबत प्रतिक्रिया देतांना सर्व जुन्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणारे ‘ओल्ड इज गोल्ड’ या संकल्पनेचे संस्थापक माजी नगरसेवक राजू दुर्गे म्हणाले की, हे सर्व जुन्या कार्यकर्त्यांच्या एकीचे बळ आहे ते यापुढेही आम्ही कायमस्वरुपी असेच ठेऊ. ज्याप्रमाणे 2017 च्या निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला त्याची पुनरावृत्ती कदापी होऊ देणार नाही, याची आम्ही सर्वजण मिळुन काळजी घेऊ. जुन्या कार्यकर्त्यांना शहर संघटनेत महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. त्यांनी घेतलेल्या जुन्या कार्यकर्त्यांबाबतच्या सकारात्मकतेने नक्कीच पुढे जाऊ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.