Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग कॉलेजचा संघ एम बाहा मध्ये प्रथम  

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील (Pimpri)डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाची “जेनेसिस 16” या संघाने एम बाहा एस ए इ इंडिया -24 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रवेग श्रेणी (Acceleration category) मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
 एम बाहा ही एस ए इ इंडिया द्वारे आयोजित (Pimpri)इंजिनीरिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली  जाणारी स्पर्धा असून यामुळे 71 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत, संपूर्ण भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी खडबडीत भूप्रदेशातील कठोर घटकांना तोंड देऊ शकतील अशा वाहनांची रचना, निर्मिती विद्यार्थ्यांकडून तयार केलेल्या वाहनांची स्पर्धा घेण्यात येते .

 

Wakad : पीएमपी बस प्रवासात सव्वा लाखाची सोन्याची बांगडी चोरीला

एम बाहा एस ए इ इंडिया 2024 ही स्पर्धा पिथमपूर, इन्दौर  येथे आयोजित करण्यात आली होती. जेनेसिस 16 या संघाला  उप प्राचार्य डॉ. सुनील डंभारे,प्रा.सुशील गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

 या यशाबद्दल डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त  तेजस एस. पाटील , संस्थेचे चेअरमन  सतेज डी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, शैक्षणिक संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम, प्राचार्या अनुपमा पाटील, कुलसचिव वाय के पाटील, गणेश जाधव यांनी  सर्वांचे अभिनंदन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.