Pimpri : सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीनिमित्त भिम शक्ती कमिटीच्यावतीने अभिवादन

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीनिमित्त भिम शक्ती पिंपरी चिंचवड( Pimpri) शहर कमिटीच्या वतीने पिंपरी येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस भिम शक्ती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सर्वहारा चिंतन समाज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बीबी शिंदे, भीमशक्ती संघटनेचे नरेन्द्र सोनटक्के, दयानंद बनसोडे, शिवा जाधव, शिवराज थोरात, तसेच बसपा युवा नेते चंद्रकांत सोनवणे, सर्व आहारात चिंतन समाज संघटनेचे सागर ओरसे, हरिश्चंद्र शिंदे, राम ओव्हाळ, विठ्ठल लांडगे, दिलीप बनसोडे तुकाराम गव्हाणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Maval : महिंद्रा कंपनी व रोटरी क्लबकडून 135 विद्यार्थिनींना सायकल वाटप

भिम शक्ती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड, व (Pimpri)सर्वहारा चिंतन समाज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बी.बी. शिंदे, बसपाचे चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रास्ताविक शिवा जाधव, सुत्रसंचालन नरेंद्र सोनटक्के यांनी केले व आभार दयानंद बनसोडे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.