Chinchwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बातम्यांच्या वॉल पोस्टर्सचे चिंचवडमध्ये प्रदर्शन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या (Chinchwad )13 सप्टेंबर 2013 रोजीच्या गोवा येथील राष्ट्रीय अधिवेशन ते आज पर्यंतच्या प्रकाशित बातम्यांचे वॉल पोस्टर्सचे प्रदर्शन कलारंग सांस्कृतिक कलासंस्थेच्या वतीने आयोजित केले आहे.

5 ,6, 7 जानेवारी असे तीन दिवस चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कलादालनात हे प्रदर्शन भरणार असल्याची माहिती भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.

Pimpri : सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीनिमित्त भिम शक्ती कमिटीच्यावतीने अभिवादन

प्रदर्शनाचे उदघाटन आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपच्या प्रभारी वर्षा डहाळे, अमर साबळे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन उपस्थिती असणार आहेत.

आपला आदर्श… आपली प्रेरणा नवं भारत निर्माण संकल्पक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Chinchwad )यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दी वर आधारित कार्य , कर्तव्य , विकास, नव संकल्पना , शासन , प्रशासन व दूरदृष्टी नियोजनावर आधारित महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र व माहितीच पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेंद्र मोदी प्रदर्शन होणार आहे. एका परीपूर्ण भारताची उभारणी करणारा नेता, नेता नव्हे प्रधानसेवक, त्यांच्या नि:स्वार्थी देशसेवेला पाठींबा देण्यासाठी सन्मान पंतप्रधान पदाचा … गौरव प्रधानसेवक कार्याचा … नवा वर्ष नमो वर्ष 2024 संकल्पना आपण पिंपरी-चिंचवड महानगरात राबवित आहोत.

लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता वृत्तपत्रातून प्रकाशित छायाचित्र व बातम्यांच्या संकलनातून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथील 13 सप्टेंबर 2013 ते आज पर्यंतच्या प्रकाशित बातम्यांचे वॉल पोस्टर्स व संकलित पुस्तकातून आम्ही भारतीय नागरिकांपुढे प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे आणत आहोत .

जवळपास 10 वर्षांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान ते प्रधानसेवक नरेंद्र मोदी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष तथा निमंत्रक अमित गोरखे असणार आहेत. प्रदर्शनाचे संयोजक नितीन चिलवंत व शिवकुमार सिंह बैस असणार आहेत. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.